प्रेस मीडिया लाईव्ह :
2004 साली मुंब्रा येथील राहणारी इशरत जहाँ वय वर्ष 21 या मुलीचा त्याचे सोबत जावेद शेख, प्रणेश पिल्ले, अमजद अली अन्य तरुणांचा गुजरात मध्ये एन्काऊंटर करण्यात आला होता.नरेंद्र मोदी यांची हत्याचा आरोप करीत त्या सर्वांचा एन्काऊंटर झाल्याची घटना जगप्रसिद्ध आहे. त्या फेक एन्काऊंटरचा पडदा फाश करणारी पुस्तक. त्याचा शीर्षक आहे. "इशरत जहाँ एन्काऊंटर" या नावाने नवीन पुस्तक बाजारात आली आहे.
2006 सिरीयल बॉम्बस्फोटाच्या खोट्या केस मध्ये नऊ वर्ष तुरुंगात राहून कोर्टातून निर्दोष सिद्ध झालेले. मुंबई येथील प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी नुकताच इशरत जहाँ यांची आई शमीमा कौसर व अन्य मान्यवरांचे उपस्थितीत मुंब्रा येथे पुस्तक प्रकाशित केली आहे.सदर पुस्तकाचा लोकार्पण सोहळा पुणे येथे मंगळवार दिनांक 24/1/2023 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आले होते.सदर पुस्तकासाठी सध्या हॉल उपलब्ध होत नसल्याने आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दिनांक शनिवार 21/01/2023 रोजी सावित्रीबाई फुले स्मारक, गंज पेठ पुणे. या ठिकाणी आयोजकांनी कायदेशीर महानगरपालिकेचे असलेले भाडे भरले. व्यवस्थापकाने भाडे स्वीकारले व तशी हॉल आरक्षित केल्याची भाडे पावती दिली. या प्रकाशन सोहळा बाबत उपस्थित राहणारे माजी. न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, रिटायर्ड. आईजी एस.एम. मुश्रीफ व अन्य वक्त्यांची माहिती खडक पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. संगीता यादव यांना समक्ष भेटून देण्यात आली. तसा अर्ज ही त्यांनी स्वीकारला.अचानक रविवारी सकाळी हॉलची देखरेख करणारे महापालिका कर्मचारी मा. कोडीतकर साहेब यांचा फोन आला की तुमची पुस्तक सेन्सिटिव्ह आहे. पुस्तक प्रकाशनासाठी तुम्हाला दिलेला हॉल तो आम्ही रद्द करीत आहोत. कृपया आपण आपले पैसे घेऊन जावा असे सांगितले.
याच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला देखील दिनांक 18/1/2023 रोजी आजम कॅम्पस पुणे या ठिकाणी अर्ज केला होता. तसे कार्यक्रमचे निमंत्रण पत्रिका, हांडविल, पोस्टर्स, सोशल मीडिया व्हाट्सअप च्या माध्यमातून लोकांना या सोहळ्याची माहिती देण्यात आली होती. त्याही ठिकाणी अचानकपणे प्रकाशन सोहळा आजम कॅम्पस येथील व्यवस्थापकाने रद्द करण्यात आल्याची माहिती फोनवर कळविले. त्यानंतर आयोजकांनी सावित्रीबाई फुले स्मारक या ठिकाणी धाव घेतली. व कायदेशीर रित्या हॉल बुक केले. पुस्तक वादग्रस्त असल्याची माहिती आजम कॅम्पस येथील हॉल देखरेख करणाऱ्यांनी दिली. तर सेम टू सेम तीच माहिती सावित्रीबाई फुले स्मारक येथील व्यवस्थापकाने दिली आहे.
अचानकपणे दोन दोन हॉल रद्द झाल्याने आयोजकांना प्रश्न निर्माण झाले आहे की. 2004 साली झालेल्या गुजरात फेक एन्काऊंटरची माहिती देणारी पुस्तक. पडदा फाश करणारी पुस्तक पुण्यात प्रकाशित होऊच नये. असे दबाव कोण आणत आहे?. कुणाच्या सांगण्यावरून हॉल मध्ये होणारे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. या सर्व गोंधळ पाहता तातडीची बैठक कार्यकर्त्यांची घेऊन कोणत्याही परिस्थितीत नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येणार नाही. आहे त्याच ठिकाणी म्हणजेच सावित्रीबाई फुले स्मारक या ठिकाणी 24/1/2023 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सर्व मान्यवरांचे उपस्थित पुस्तक प्रकाशन सोहळा होणार. जरी त्यांनी विरोध केला तरी कार्यक्रम सावित्रीबाई फुले स्मारकच्या गेट समोर मांडी घालून कार्यकर्ते बसतील आणि त्या पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम आम्ही करू असे निर्धार कार्यकर्त्यांनी केले.