प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : डॉ. विक्रम शिंगाडे, बेडकिहाळ ता-निपाणी जि-बेळगाव... हे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात एक निर्भीड पत्रकार म्हणुन ओळख आहे. ते अनेक क्षेत्रांमध्ये बातमी देत असताना सत्य जे असेल ते व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडुन न्याय मिळवून देण्याचे धाडस ते करत असतात. त्यांची जिल्ह्यामध्ये एक निर्भीड पत्रकार म्हणुन ओळख आहे. म्हणुन राष्ट्रीय डिजिटल प्रेस मीडियाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये एकमताने डॉ.विक्रम शिंगाडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
त्यावेळी राष्ट्रीय डिजिटल मीडियाचे अध्यक्ष मेहबुब सर्जेखान यांच्या उपस्थितीत व सर्वांच्या एकमताने निवड करण्यात आली. संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले .
या निवडी मुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.