प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या सोमवारी होणार आहे. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला येथून संधी द्यावी, तसेच निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार की स्वतंत्र..? या वर चर्चा केली जाणार आहे. या पोटनिवडणुकी कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची मुदत दि.31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी आहे. यामुळे ही जागा कोण लढविणार हे त्यापूर्वीच निश्चित करणे आवश्यक असल्याने ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. युतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपकडे आली. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत लढली होती. त्यात ही जागा कॉंग्रेसकडे गेली. शिवसेना नगरसेवकाने बंडखोरी करून अर्ज भरला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहे; तर दुसऱ्या बाजूला या मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनीही पक्षाने आदेश दिल्यास आपण तयार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे कसबा विधानसभा निवडणुकीसाठी तीनही पक्ष तयार असल्याने याबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी सोमवारी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून 'कसबा'कोणाकडे ? जाणार या कडे सर्वांच्या लक्ष लागून रााहिलेले आहे.