प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : - रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार हा मानाचा क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार कराटे प्रशिक्षक मीरअली सय्यद या होतकरू क्रीडा प्रशिक्षकास प्रदान करण्यात आला. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व नगरसेवक अविनाश बागवे यांच्या वतीने विविध क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकास राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी देण्यात येणारा रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार हा मानाचा क्रीडा पुरस्कार कराटे प्रशिक्षक मीरअली सय्यद यांना काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन जोशी यांच्याहस्ते प्रदान केले गेला.
विजेत्याला व मा गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते रोख रक्कम दहा हजार (१०,०००) रुपये, स्मृतीचिन्ह, प्रशिस्त पत्रक, शाल व बुके देऊन प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त नगरसेवक अविनाश बागवे, पै. हरिश्चंद्र बिराजदार यांचे चिरंजीव पै. सागर बिराजदार, राहुल बिराजदार व काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित दादा टिळक, कानोजी जेधे व प्रतिष्ठानचे श्री. विठ्ठल थोरात, या सेर बागवे, अरुण गायकवाड, दयानंद अडगळे, रोहन थोरात, बंटी बागवे, मल्लेश धनगर व इतर उपस्थित होते.