जवानांनी आग एका तासातच आटोक्यात आणली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : येथील मंगळवार पेठ येथे जुन्या बाजारात पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आग एवढी भयानक होती की या मध्ये बाजार पेठेतील आठ दुकाने जळून खाक झाली .अग्निशमन दलाची अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली गेली. आगीमध्ये स्थानिक दुकानदारांचं मोठं नुकसान झालं असून सध्या आता कुलिंगच काम सुरू आहे. पुण्यातल्या मंगळवार पेठ जुना बाजार या ठिकाणी दाट वस्तीमध्ये चार ते पाच दुकानांमध्ये सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक धुराचा मोठा लोट पाहायला मिळाला.काही वेळानंतरच आगीचे भीषण रूप हे रस्त्यावर दिसू लागलं. या घटनेमुळे स्थानिक लोकांची चांगलीच तारांबळ उडाली असून आगीचं कारण अजूनही अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी पोहोचले.
आपलं कौशल्य दाखवत जवानांनी आग एका तासातच आटोक्यात आणली. या घटनेमुळे कोणालाही शारीरिक इजा झाल्याचे अजून माहिती पुढे आली नाही. मात्र पंचनामा आणि कुलिंग करण्याचं काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.