प्रेस मीडिया लाईव्ह :
आदानी सारख्या मूठभर भांडवलदाराना हाताशी धरून देशाची आर्थिक परिस्थिती खिळखिळी करणण्याचे काम नरेंद्र मोदी सरकार करत आहे. देशातली संपत्ती विकून देश चालवत असल्याने देशाचा आर्थिक कणा मोडीत निघाला आहे. ही दिवळखोरीची वाटचाल थांबवणे सगळ्यात महत्वाचे आहे. मतदार देशाचा मालक आहे; मतदारांनी या सरकारला २०२४ च्या निवडणुकीत झुकवल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेलमध्ये टाकल्याशीवाय राहणार नाही, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघांच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी नुकत्याच झालेल्या युतीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच पुण्यात झालेल्या या सभेकडे लक्ष लागले होते. सभेस वंचित बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचितचे पश्चिम हवेली आघाडीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी सभेचे संयोजन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे मनोगत व्यक्त केले. आघाडीचे विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी प्रस्तावित केले आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले . वंचीतच्या नेत्याप्रा. अंजली आंबेडकर,युवा अध्यक्ष अमित भुईगळ, पुणे जिल्ह्याचे प्रभारी प्रा. किसन चव्हाण , आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड चे सदस्य अशोक सोनवणे आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
शिवसेना ठाकरे गटाबरोबर झालेल्या युतीनंतर प्रकाश आंबेडकर यांची पहिली सभा पुण्यात झाल्याने या सभेला महत्त्व प्राप्त झाले होते. व्यासपीठावर शिवसेना आणि वंचितचे पदाधिकारी असल्याने ‘शिवशक्ती भीमशक्ती चा विजय असो….’ अशा घोषणा देऊन सभी सुरुवात करण्यात आली.
देश स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खडतर परिस्थितीतून देश उभा केला आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी प्रसंगी ते कटोरा घेऊन फिरले. परंतु नरेंद्र मोदी सरकारने सरकारची वृत्ती पैसे पुरत नसल्यामुळे प्रसंगी घर विकणाऱ्या दारुड्या माणसासारखी झाली आहे. मोदी सरकारने आर्थिक गरजा भागवण्यासाठी खाजगीकरण करत सरकारी मालकीच्या अनेक कंपन्या भांडवलदारांना विकल्या आहेत तर काही विकण्यास काढल्या आहेत.
यासाठी त्यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे उदाहरण देऊन नुकतेच झालेले नुकसान स्पष्ट केले. अशीच होत राहिली तर देश आर्थिक दिवाळखोरीत निघण्यास वेळ लागणार नाही असे सांगून ते म्हणाले देशाचे खरे मालक मतदार आहेत त्यांनी मतदानातून मोदी सरकारला झुकवल्यास सर्वसामान्य लोकांचे सरकार येवू शकेल.
सभेनंतर पत्रकारांच्या प्रश्नांनाही आंबेडकर यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. ते म्हणाले, सध्या तरी आमची युती फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी आहे. आघाडीतील पक्षांबरोबर आमचे कोणतेही बोलणे झाले नाही असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मोदी सरकारचे आदानिशी असलेले संबंधामुळे सरकारी कंपनी असलेल्या भारतीय आयुर्वा महामंडळाला ४३ हजार कोटीचे नुकसान झाले तर अदानीला ७८ हजार कोटींची भरपाई देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे. सामान्य माणसाच्या जीवाशी खेळत भांडवलदारांना पाठीशी घालण्याचे काम मोदी सरकार करत आहे अशी टीका ही त्यांनी केली.
ईडी , सीबीआय सारख्या संस्थांना हाताशी धरून विरोधकांना संपवण्याचे काम हे सरकार करत असून भाजपा आणि संघाला उघडे पाडण्याचे काम वंचित आघाडी केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला .यावेळी वंचितचे निरंजन कांबळे, बाळासाहेब भालेराव , आनंद भालेराव, अनिकेत भालेराव , सागर भालेराव, ज्ञानोबा भालेराव, बाबजी कांबळे, रामभाऊ कांबळे आशोक सोनवणे, प्रकाश गायकवाड, शिवसेनेचे नितीन वाघ, संतोष शेलार ,संदिप मते,गोकुळ करंजावणे, महेश मते आदि उपस्थित होते.