समाजसेवक विरेंद्र म्हात्रे यांना राष्ट्रीय लोककल्याणकारी सेवारत्न पुरस्काराने सन्मानीत

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

   नवी मुंबई :  १५ जानेवारी रोजी लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त वाशी नवी मुंबई येथे समाजसेवक तथा लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई या संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरुभाई म्हात्रे यांना "राष्ट्रीय लोककल्याणकारी सेवा रत्न" कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.          

    


     या पुरस्कार सोहळ्याला माजी न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे,पनवेल वकील सांघटनेचे अध्यक्ष व पनवेल नगर पालिकेचे सभापती ऍड.मनोज भुजबळ,राज्यकार सह आयुक्त डॉ.डेव्हिड अल्वारीस,डॉ शैलेंद्र पवार,संयोजक सलमा खान, संस्थेचे अध्यक्ष नासिर खान,राज्य शिक्षक कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण,उद्योजक कुणाल भोईर, सिने नाट्य पत्रकार महेश्वर टेतांबे,सिने अभिनेत्री मेघना साने,सिद्धी कामत,तारक मेहता का उल्टा चष्मा कलाकार जाकीर खान उपस्थित होते. 

  समाजसेवक तथा लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई या संस्थेचे अध्यक्ष  विरेंद्र उर्फ गुरुभाई म्हात्रे यांना  लोक कल्याणकारी सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे सर्व स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post