प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई - सोशल मीडियावर जाहिरात करणाऱ्या इन्फ्लूएन्सर्ससाठी केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यामुळे इन्फ्लुएन्सर्सना आता अधिक सजगपणे जाहिरांतीच्या माध्यमातून लोकांशी संपर्क ठेवावा लागणार आहे.केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीचं उल्लंघन केल्यास सुरुवातीला १० लाख रुपये आणि सातत्याने उल्लंघन झाल्यास ५० लाखांपर्यंतचा दंड बसू शकतो. तसंच, संबंधित खांतही बंद केलं जाऊ शकतं. केंद्र सरकराने आणलेल्या या नियमावलीत नेमकं काय काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.
फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्वीटरच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर्स तयार झाले आहेत. विविध कॉन्टेट देऊन ते आपल्या ऑडियन्सचं मनोरंजन आणि शिक्षित करण्याचं काम करतात. याच माध्यमातून असे इन्फ्लुएन्सर्स विविध कंपन्यांच्या उत्पादनांचीही जाहिरात करतात. मात्र, कधीकधी इन्फ्लुएन्सर्समार्फत केलेल्या जाहिरातींमधून ग्राहकांची दिशाभूल केली जाते. चुकीची माहिती पसरवली गेल्याने ग्राहकांची फसवणूक होते. अशा घटनांपासून वाचण्याकरता केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती इन्फ्लुएन्सर्सकडून प्रसिद्ध झाल्यास त्यांना दंड भरावा लागणार आहे. तसंच, इन्फ्लुएन्सर्सना त्यांच्या डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओवर जाहिरात किंवा सशुल्क जाहिरात अशा संज्ञा वापराव्या लागणार आहेत. तसंच, इन्फ्लुएन्सर्सने वैयक्तिक एखादं उत्पादन किंवा सेवेचा लाभ घेतला नसेल तर त्याविषयी जाहिरातही करू नये किंवा समर्थन करू नये असेही या नियमात म्हटले आहे.
लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून जाहिरात करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सनाही हेच नियम लागू असणार आहेत. त्यामुळे कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात करताना इन्फ्लुएन्सर्सना आता अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
नेमकी नियमावली काय?
एखाद्या कंपनीकडून पैसे घेऊन जर ब्रॅण्डची जाहिरात केली असेल तर त्यासंदर्भात डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओवर माहिती द्यावी लागणार
संबंधित कंपनीकडून Paid Advertisement असेल तर त्याचीही माहिती द्यावी लागणार
एखाद्या उत्पादनाची स्तुती केली तरीही ती जाहिरात म्हणूनच ग्राह्य धरली जाणार. त्यामुळे याचीही माहिती द्यावी लागणार.
नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई
नियमांचं पहिल्यांदा उल्लंघन झाल्यास १० ते १५ लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
सातत्याने नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम वाढवली जाणार
आर्थिक भुर्दंडासह संबंधित सोशल मीडिया खातेही सस्पेंड केलं जाणार
एन्डोर्समेंटवरही काही काळ बंदी आणली जाईल.
इन्फ्लुएन्सर्सने हे लक्षात ठेवावं
इन्फ्लुएन्सर्सने जर कंपनीकडून पैसे घेतले असतील तर त्याचं डिस्क्लोजर द्यावं लागणार
कंपनीकडून मोफत उत्पादन मिळालं असल्यास त्याचीही माहिती द्यावी लागणार
गिफ्ट किंवा ट्रिप स्पॉन्सर्ड झाली तरीही त्याची माहिती द्यावी लागणार
फॉलोअर्सना समजेल अशा भाषेत कॉन्टेट असला पाहिजे.