महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम" संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह : 

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचालित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पेठ वडगाव येथे दि.२५ जानेवारी,२०२३, बुधवार रोजी महाविद्यालयामध्ये "महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम" हा कार्यक्रम आयोजित केला होता.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या  मा.डॉ. अश्विनी राजाराम ठाणेकर (राज्यकर उपायुक्त, वस्तू व सेवा कर भवन, कोल्हापूर) व प्रमुख उपस्थितीमध्ये मा.डाॅ.स्मिता दत्तात्रय राणे(प्राचार्या महिला बी.एड. काॅलेज मार्केट यार्ड कोल्हापूर) ,तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ निर्मळे आर. एल. महाविद्यालयातील महिला प्राध्यापक वर्ग प्रा.शिरतोडे व्ही.एल.,प्रा.सांवत ए.पी.,प्रा.चरणकर जे.एस.ग्रंथपाल चौगुले एस.एस. तसेच बी. एड. प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व छात्राध्यापिका ई.सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  छात्राध्यापिका उषादेवी कुंभार,   पाहुण्यांची ओळख छात्राध्यापिका दिपाली गुरव , आभार छात्राध्यापिका श्रद्धा पवार यांनी केले .

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका  दिव्या माने व  शिवानी पाटील यांनी केले. अशोकराव माने विद्यानगर कॅम्पस मधील सर्व युनिटमधील महिला स्टाफ यांनीही कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. कार्यक्रमांमध्ये प्रतिमा पूजन,  दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख व स्वागत तसेच सर्व महिलांसाठी फनी गेम्स व स्पॉट गेम्स  यांचे नियोजन केले होते.तसेच प्रमुख पाहुण्या व प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणेकर मॅडम व राणे मॅडम यांनी सर्व छात्राध्यापिकांना उद्देशून मार्गदर्शन व हळदी- कुंकू कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. तसेच प्राचार्या निर्मळे मॅडम यांनी अध्यक्षीय भाषण केले.शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  फनी गेम्स  व स्पोर्ट गेम्स मधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन तसेच उपस्थित सर्व महिलांना संक्रांतीचे वाण देऊन कार्यक्रम आनंदामध्ये संपन्न झाला.कार्यक्रम संपन्न करण्यासाठी बी. एड. मधील सर्व स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी, छात्रध्यापिका, छात्राध्यापक यांची मदत झाली.

Post a Comment

Previous Post Next Post