प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडून कोल्हापुर शहरातील दुचाकी वाहनांवर ट्रिपल सिट घेऊन जाणा-या वाहन धारकांनावर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांविरुध्द दिनांक- १८/०१/२०२३ रोजी विशेष मोहीम राबवुन १०२ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असुन सदर वाहन चालकानां १०००/- प्रमाणे दंड आकरण्यात येतो तसेच त्या वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना ३ महीन्याकरीता निलंबीत करण्यात येतो. यापुढेही ही मोहीम
तीव्र स्वरुपात राबविली जाणार आहे. तरी कोल्हापूर शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडून सर्व नागरिक / वाहनचालक यांना आवाहन करण्यात येते की, ट्रिपल शिट वाहन चालविल्याने वाहनाचा अपघात होण्याची शक्यता असते. कोल्हापूर शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडुन या पुढे ही विविध वाहतुक नियमानुसार जास्तीत जास्त विशेष कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असुन वाहनांचे अपघाताचे प्रमाण अत्यल्प करण्याचा मानस आहे. तरी वाहतुक नियमांचे पालन करुन नागरीकांनी सहकार्य करावे.