प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या पर जिल्ह्यातील एका आरोपीसह एका मुलाला ताब्यात घेतलय. निकाजी काळे असं त्याचं नाव असून त्याच्याकडून घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणारा आरोपी पन्हाळा तालुक्यातील काखे फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून निकाजी काळे याच्यासह एका मुलाला ताब्यात घेतलय. त्याच्याकडून चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणत सोन्या चांदीचे दागिने रोकड आणि एक मोटरसायकल असा सुमारे एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गोरले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे, अंमलदार वसंत पिंगळे, हिंदुराव केसरे, संजय हुंबे, प्रशांत कांबळे, रणजीत कांबळे, असिफ कलाईगार, संजय पडवळ, संतोष पाटील, राजेंद्र वरंडेकर, अनिल जाधव आणि सहकाऱ्यांनी केलीय.