प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्परचालकांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, इ एस आय कार्ड मिळावे यासाठी आम आदमी पार्टीचे सत्याग्रह आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महापालिका अधिकाऱ्यांना व्हाट्सअप्प संदेश पाठवून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. थकीत पी एफ रक्कम जमा न झाल्यास उद्या कामावर न येण्याचा इशारा देखील या संदेशामध्ये देण्यात आला होता. सायंकाळ अखेर ठेकेदार कंपनीने टिप्परचालकांचा सप्टेंबर अखेरचा पी एफ जमा केला. इ एस आय कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
थकीत पी एफ जमा झाल्याने काम बंद आंदोलन स्थगित करत आहोत. किमान वेतन प्रश्नी सोमवारी महापालिकेत बैठक बोलावली आहे. टिप्परचालक घेण्यासाठी काढलेले टेंडर रद्द करून नवीन टेंडर काढावे जेणेकरून चालकांना किमान वेतन मिळेल अशी मागणी बैठकीत करणार असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.
यावेळी सूरज सुर्वे, उत्तम पाटील, संतोष घाटगे, अभिजित कांबळे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, रणजित बुचडे, युवराज कवाळे, करण चौधरी, नितीन कवाळे आदी उपस्थित होते.