इचलकरंजी येथे महिलांचा हळदी कुंकू समारंभ व राष्ट्रीय युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.



प्रेस मीडिया लाईव्ह ;

इचलकरंजी : राष्ट्रीय युवा शक्तीच्या माध्यमातून आज इचलकरंजी येथे महिलांचा हळदी कुंकू समारंभ व राष्ट्रीय युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.राष्ट्रीय युवाशक्तीच्या माध्यमातून इचलकरंजी येथे हळदी कुंकू कार्यक्रमासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला

26 जानेवारी 74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्रीय युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले लोकक्रांती विकास आघाडीचे अध्यक्ष दत्ता मांजरे यांच्या व राष्ट्रीय युवाशक्तीचे संघटन मंत्री सौ श्वेता चौगुले यांच्या हस्ते सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 

 महाराष्ट्राचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री अशोक टोमके पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राकेश खोंद्रे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मोनिका जाधव, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सखाराम जाधव, कोल्हापूर जिल्हा प्रभारी संजय कदम, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिला राधिका उपलांची, कविता डांगरे, अर्चना थोरवी ,अंजली दुर्गुडे वंदना भंडारे इत्यादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती .

 राष्ट्रीय युवाशक्तीच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय युवाशक्तीचे अध्यक्ष राघवेंद्र पांडे जी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री सुनील परदेशी जी व श्री राहुल जोरे जी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post