प्रा.पां.ना.कुलकर्णी जन्मशताब्दी सोहळा संपन्न
प्रेस मीडिया लाईव्ह :
बेडकिहाळ गावचे सुपुत्र, मराठी संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आणि 'ज्ञानेश्वरी' च्या प्राचीनतम हस्तलिखित प्रतीचे संशोधक, संपादक कै.प्रा.पां.ना.कुलकर्णी यांचे जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रम दि २२ रोजी श्रीमती कुसुमावती मिरजी कला व वाणिज्य महाविद्यालय सभागृह, बेडकिहाळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.सी.बी.देसाई हे होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ.श्री.प्रतापसिंह जाधव, संपादक पुढारी दैनिक व्रुतपत्र, कोल्हापूर हे होते.
प्रारंभी कु.वैष्णवी जाधव हिने ईशस्तवन गायिले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. नंतर कै.प्रा.पां.ना.कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक भाषण साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डी.एन.दाभाडे यांनी केले. तर मान्यवरांचा परिचय प्रा.डाॅ.गोपाळ महामुनी यांनी केले.सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मनोगतात डॉ.प्रतापसिंह जाधव म्हणाले की आपण ज्या समाजात रहातो,वावरतो त्या समाजाचे आपण काहितरी देणे लागतो. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने समाजासाठी कार्य केले पाहिजे. आपण वयाने कितीही मोठे झालो तरी नेहमीच विद्यार्थी वेशेत वावरले पाहिजे. जेणेकरून आपल्याला ज्ञानाचे संपादन होत राहिल. कै.प्रा.पां.ना.कुलकर्णी यांनी प्रतिकुल परिस्थितीतही संत साहित्याची हस्तलिखिते जतन केली.त्यातुनच त्यांना ज्ञानेश्वरी चे प्राचीनतम हस्तलिखित मिळाले.त्यांना संत साहित्याचे पितामह म्हणटले तर वावगे ठरणार नाही असे ते म्हणाले.त्यांचे नावे पुतळा, स्मारक उभारन्यापेक्षा शाळा किंवा ग्रंथालय उभी करा जेणेकरून त्यांच्या कार्याचा गौरव होईल असे ते म्हणाले.
कै.कुलकर्णी यांची कन्या डॉ.स्मीता कुलकर्णी यांनी आपला अनुभव सांगितला वडील कुलकर्णी हे साहित्याचे संशोधन करणारे एक कर्मयोगी होते. त्यांनी दिलेल्या साहित्यातील योगदानामुळेच अनेकांना वाचनाबरोबरच ज्ञान मिळाले आहे.असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ.सी.बी.देसाई यांनी डॉ. कुलकर्णी यांनी जिज्ञासू वृत्ती अविरत जोपासली. त्यांच्या साहित्यामुळेच माणूस जवळ आला. तर सामाजिक अस्थिरता दुर करन्याचे सामर्थ्य संत साहित्यात आहे. असे ते म्हणाले.
यानंतर प्रकाश माळी यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. कै.पा.ना.यांच्या शिवाजी विद्यापीठातील ध्वनीमुद्रण भाषणाच्या काही ओळी ऐकवन्यात आल्या.
त्यावेळी प्रा.पा.ना.यांचे सुपुत्र दिलीप कुलकर्णी, ॲड.संजय कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, अंजली कुलकर्णी,चारुदत्त कुलकर्णी यांच्या सह साहित्य प्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रकाश काशिद यांनी केले.तर आभार प्रमोदकुमार पाटील यांनी मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.