प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ/ प्रतिनिधी:
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील यांची नुकतीच सांगली येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल श्री दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जयसिंगपूर उदगांव सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, दत्तचे संचालक दरगु गावडे, दत्तचे सचिव अशोक शिंदे, जयसिंगपूरचे दिपक पाटील, प्रा. मोहन पाटील, मुसा डांगे, कारखाना जन संपर्क अधिकारी दादा काळे, पत्रकार दगडू माने आदी मान्यवर उपस्थित होते.