साखरी येथे फेरनिवडणूक लागणार का याची चर्चा सुरू.
प्रेस मीडिया लाईव्ह :
साखरी : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी वेळी साखरी येथे मतदान केंद्रावर प्रभाग 1 व 2 मध्ये जी EVM मशीन वापरली आहेत ती सदोष असल्याचा संशय उमेदवारांनी केला आहे कारण सुरुवातीस जे EVM वापरले ते मशीन 6 व्या मतदान वेळी बंद पडले..आणि प्रत्यक्ष मतमोजणी वेळी सुद्धा त्यातील 3 मते प्रत्यक्ष उमेदवार व त्यांच्या घरातील 3 व्यक्तीनी मतदान केले होते त्यातील फक्त 1 च मतदान फक्त उमेदवाराला कसे पडू शकते.?.. त्याच बरोबर ...1 व 2 प्रभागात मशीन काही काळ बंद पडली होती त्याचा वेळ वाढवून न दिल्याने बरेच मतदार मतदानाचा हक्क बजावू शकले नाहीत..तसेच वयस्कर व्यक्ती स्वतः मतदान करू शकत असताना देखील उमेदवारांच्या प्रतिनिधी नी स्वतःच अनेक वेळा मतदान केले तरी सुद्धा त्यावर तेथील अधिकाऱ्यांनी कोणताच आक्षेप घेतला नाही..विरुद्ध उमेदवार नी वारंवार आक्षेप घेऊन सुध्दा गावातील 90% वयस्कर व्यक्तींना स्वतः मतदान करू न देता किंवा त्यांच्या रक्तातील नात्यातील कोणीही नसताना देखील उमेदवारांच्या प्रतिनिधीनी स्वतः EVM ची बटन दाबून मतदान करत होते..
ज्यांना चालता येत होते दिसत होते अशा मतदारांना देखील घेऊन गाड्या 100 मीटर च्या आत मतदान केंद्राच्या पायरी पर्यन्त गाड्या घेऊन येत होते व इतर मतदारांवर प्रभाव टाकत होत्र.. ड्युटी वरील दोन लेडीज पोलीस वारंवार त्यांना सांगून देखील एका पॅनेल चे लोक ऐकत नव्हते.ग्रुप ने थांबून येणाऱ्या जाणाऱ्या मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत होते. हा प्रकार मतदान संपेपर्यंत सुरू होता..असे गैर प्रकार या मतदान केंद्रावर होत होते..या व सदोष EVM मशीन मुळे त्यांना 80 % जनतेचे जनमत असताना देखील पराभव दाखवला गेला ..हे त्यांना मान्य नाही त्यामुळे येथे CCTV केमॅरे व निष्पक्ष अधिकाऱ्यांन च्या व पोलीस बंदोबस्त खाली फेरमतदान व्हावे अशी मागणी उमेदवारानी केली .. व तशा संदर्भात अर्ज ही तहसीलदार व निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांचे कडे केले आहे.तसेच गावात सुद्धा या अनपेक्षित निकला विषयी संशय व्यक्त केला जात आहे..परत साखरी येथे *फेरनिवडणूक* लागणार का याची चर्चा सुरू आहे.