प्रेस मीडिया लाईव्ह :
राळेगणसिद्धी येथे आपले मानवाधिकार फाउंडेशन मार्फत जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त कॉलेज ऑफ एज्युकेशन पेठवडगाव च्या प्र प्राचार्या रेखा निर्मळे - चौगुले यांना आपले मानवाधिकार भूषण पुरस्कार 2022 आमदार निलेशजी लंके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
राळेगणसिद्धी येथे आपले मानवाधिकार फाउंडेशनचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन ११ डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आले . अधिवेशनामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले या अधिवेशनामध्ये आमदार निलेशजी लंके ,डॉक्टर दीपेश पष्टे (आपले मानवाधिकार संचालक )
तसेच छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष शंकर (आप्पा) जाधव उपस्थित होते. प्राचार्य रेखा निर्मळे- चौगुले यांचे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्य देखील उल्लेखनीय आहे. त्यांना वेगवेगळ्या सामाजिक व शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे .वेगवेगळ्या सामाजिक समित्यावर त्या सध्या कार्यरत आहेत. त्यांचे समाजातील विविध स्तरांमधून कौतुक होत आहे.
राळेगणसिद्धी येथे राज्यभरातून सन्मानासाठी आरोग्य, शैक्षणिक, कला क्षेत्रातील आलेले नागरिक, तसेच तृतीयपंथी यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आपले मानवाधिकार फाउंडेशनचे सहसंचालक प्रफुल भटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेश पष्टे व राष्ट्रीय सहसचिव गणेश तांबे, राज्याध्यक्ष गणेश उमराठकर, राज्य प्रमुख सचिन जाधव, राज्य समन्वयक अरुण घासे उपस्थित होते. यावेळी संगमनेर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनिल भाऊ उकिर्डे आणि अध्यात्मिक क्षेत्रातील महाराज , आपले मानवाधिकार फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव रेणुका दिघे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दर्शन जोशी, सामाजिक कार्यकर्ते शंकर अदानी उपस्थित होते