प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
दिनांक ०९/१२/२०२२ ते दिनांक १४/१२/२०२२ रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पार पडलेल्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धेत रायगड जिल्हा पोलीस दलाने पदकांचे शिखर सर करीत "सर्व साधारण विजेते पदावर आपले नाव कोरले आहे.
दरवर्षी पार पडल्या जाणा-या या कोकण परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेचे सन २०२२ चे यजमानपद नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे भुपविण्यात आले होते. त्याकरीता कोकण परिक्षेत्रामधून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबईच्या पोलीस दलातर्फे पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी सांघिक तसेच वैयक्तीक खेळ प्रकारात आपली कुमक दाखवित आपला सहभाग नोंदविला. क्रिडा स्पर्धेतील सांघिक प्रकारामध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅन्डबॉल, कबड्डी, खो-खो, क्रॉसकंट्री तसेच वैयक्तीक प्रकारामध्ये कुस्ती, ज्युदो, वेट लिफ्टींग, जलतरण, बॉक्सींग, अॅथलेटीक्स, वृ-शो, त्वायकांदी अशा वैयक्तीक खेळ प्रकारांचा समावेश होता.
रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांच्या आधिपत्याखाली ७ पोलीस अधिकारी व ११९ पोलीस अंमलदार यांनी आपल्या कामगिरीमध्ये चमक दाखवित सांघिक खेळ प्रकारात ८ पैकी ७ मध्ये प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त केले तसेच वैयक्तीत खेळ प्रकारामध्ये १३३ सुवर्ण पदक, ५७ रजत पदक, ५७ कांस्य पदकांच्या कमाई अशा एकुण २२४ गुणांसह रायगड जिल्हयाने सर्व साधारण विजेते पदावर शिक्कामोर्तब केले. रायगड पोलीस दलातर्फे राखिव पोलीस उप-निरीक्षक जुनेद शेख व गेमइंचार्ज पौना / ऋषीकेश साखरकर यांनी पुर्ण संघाचे नेतृत्व केले आहे..
रायगड जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी अथक परिश्रमाने प्राप्त केलेल्या यशाने रायगड जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तब्बल १२ वर्षानंतर रायगड जिल्हा पोलीस दलाने कोकण परिक्षेत्रीय स्पर्धेमध्ये विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. खेळाडूंनी केलेल्या या उल्लेखनिय कामगिरीचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून कौतुक केले आहे व भविष्यात देखील अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करून भविष्यामध्ये देखील अशीच उज्वल कामगिरी कराण्याकरीता शुभेच्छा दिल्या..