प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
आज चां तरुण पाहिला तर शारीरीक कसरत ह्या बाबी कडे दुर्लक्ष करत क्रिकेट, मोबाईल, फास्ट फूड सेवन याकडे जास्त लक्ष देताना दिसत आहे, परंतु आई गावदेवी क्लब केलवणे गावातील तरुणांनी आपल्या मैदानी खेळाला महत्व देत आज कब्बडी मैदानाचा श्री गणेशा केला आहे.
तरुणांना शारीरिक कसरती साठी नवीन व्यासपीठ निर्माण करून तरुणानी ह्या संधीचा लाभ घेऊन आपल्या शारीरिक व्यायामा व्यतिरिक्त ह्या कसरतीचा फायदा भविष्यात नोकरी साठी आणि सुदुढ शरीरा साठी होईल असे मत निवास गावंड सर यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमा प्रसंगी आई गावदेवी क्लब केलवणे चे देवेन ठाकूर,हर्षल सुर्यवंशी तसेच सर्व खेळाडू सोबत सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड सर सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, विक्रांत घरत, विलास शिवकर , संदीप घरत.आदी मान्यवर उपस्थित होते भविष्यात कबड्डी च्या स्पर्धा भरण्याचा मनोदय आहे असे मत आई गावदेवी क्लब केलवणे चे देवेन ठाकुर यांनी व्यक्त केलं