व्यापारी व दुकानदार यांचा बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग
प्रेस मीडिया लाईव्ह :
पूणे:राज्यातील संविधानिक पदावरील तसेच अन्य जबाबदार व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार होत असलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख बाजारपेठ असलेला लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच टिळक रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
याखेरीज, सजावटीच्या साहित्यांनी गजबजणारी बोहरी आळी, रविवारी पेठेतील भांडी आळी, बुधवार पेठेतील चोळखण आळी, अप्पा बळवंत चौक परिसर याखेरीज, महिलांच्या खरेदीचे आवडते ठिकाण असलेल्या तुळशीबागेतही दुकानदार वर्गाकडून उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात आला आहे.मध्यवर्ती भागासह उपनगरांतील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरल्याचे चित्र आहे.