पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर आकारण्यात येणारी तीन पट शास्ती रद्द करावी.. मनसेची मागणी..



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर आकारण्यात येणारी तीन पट शास्ती रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.

त्याबाबतचे निवेदन पक्षाच्या वतीने शुक्रवारी आयुक्त कुमार यांना देण्यात आले. हा निर्णय तातडीने घेऊन शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.शहरात झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या सेवा सुविधांवर ताण येत असला तरी या नागरिकांना महापालिकेने सेवा देणे आवश्‍यक आहे. मात्र महापालिका सेवा देण्याऐवजी या बांधकामांकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जात आहे. मात्र आता शासनाच्या निर्णयामुळे शहराच्या शेजारी असलेल्या महापालिकेत वेगळा निर्णय आणि पुण्यात वेगळी कारवाई असे चित्र आहे.

त्यामुळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निर्णयाचे पुणे महापालिकेने अनुकरण करावे, अशी मागणी शहर मनसेकडून करण्यात आली आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे नेते राजेंद्र वागसकर, सरचिटणीस अजय शिंदे, हेमंत संभूस, किशोर शिंदे, उपाध्यक्ष गणेश सातपुते, बाळा शेडगे, रणजित शितोळे, योगेश खैरे यांच्या वतीने हे पत्र देण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post