एकूण मुस्लिम 40 संघटनांनी जाहीररीत्या पाठिंबा व्यक्त केला
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : आज दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन ते पाच या दरम्यान लेडी हवाबाई शाळा बाबाजान दर्गा कॅम्प या ठिकाणी समन्वय समिती सोबत संयुक्त मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
मा. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, शिवप्रेमी संतोष शिंदे, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, संजय मोरे, या सर्व शिवप्रेमी संघटना सोबत साधारण 200 मुस्लिम कार्यकर्ते सामाजिक संघटनाचे पद अधिकारी धार्मिक क्षेत्रातील मौलाना मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधव 13 डिसेंबरच्या बंद मध्ये सामील होण्याची घोषणा व तसा अधिकृत पाठिंबाचा पत्र त्या ठिकाणी दिले आहे.
छत्रपती शिवाजी मार्केट व्यापारी संघटना, जमाते इस्लामी हिंद, जमियत उलेमा हिंद, जमीयतूल कुरेश, एम आय एम, ॲक्शन कमिटी, उम्मत सामाजिक संस्था, शाहीन फ्रेंड सर्कल, नदाफ पिंजारी मन्सुरी जमात, पुणे एनजीओ फेडरेशन, बजमे इस्लाहा, इंडियन मुस्लिम फ्रंट, बजमे रेहेबर, फैजाने रजा, कोंढवा सोशल फाउंडेशन, होकर संघटना, शेरे हिंद फौंडेशन, अल कुरेशी यंग सर्कल,
इत्यादी संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते व स्वतः बंदचे मुख्य आयोजकांना पत्र दिले.