प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : देश विरोधी कारवाया व देशातील बॉम्बस् फोटांबाबत न्यायालयात केस सुरू असताना दिल्ली येथील लेखिका स्मिता मिश्रा यांनी कर्नल पुरोहित यांच्यावर " लेफ्टनंट कर्नल पुरोहित ; द मॅन बॅट्रेट " हे पुस्तक लिहिले आहे. कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांचे गौरवीकरण व उदातीकरण करणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशनाच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली.
एसपी कॉलेज जवळ भीमआर्मी बहुजन एकता मिशन, व मूलनिवासी मुस्लिम मंच तसेच इतर पुरोगामी संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व भीमआर्मीचे नेते दत्ता पोळ , मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अंजुम इनामदार यांनी केले. याप्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर समर्थन दिले.
अंजुम इनामदार यांनी सांगितले की, पुरोहित यांचे गौरवीकरण व उदातीकरण करणारे पुस्तक लिहून सामान्य जनतेला काय संदेश द्यायचा आहे? कर्नल पुरोहित यांच्यावर कशा पद्धतीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला? जाणीवपूर्वक विस्फोटामध्ये कर्नल पुरोहित यांना गोवण्यात आले आहे, कर्नल पुरोहित यांच्याबरोबर धोका झाला आहे असा संदेश पुस्तिकाचे लेखिका यांना द्यायचा आहे का? हा एक खूप मोठा प्रश्न या पुस्तकाच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
संपूर्ण देशाला हादरा बसविणारा 2006 - 2008 या वर्षात मालेगाव ( नाशिक ) येथील बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य संशयित आरोपींपैकी लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यावर आधारित हे पुस्तक आहे. त्यात ही सर्वात गंभीर बाब म्हणजे या पुस्तक प्रकाशाच्या कार्यक्रमा मध्ये आयपीएस दर्जाचे पुण्यातील दोन माजी पोलीस आयुक्त व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त कार्यक्रमाला हजर राहतात ही खूप दुर्दैवी बाब आहे. यातून देशात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आज रोजी पुण्यातील या प्रकाशन सोहळ्याला आम्ही विरोध केला.
इनामदार म्हणाले की अभिव्यक्ती स्वतंत्र आहे पण त्याचा गैरफायदा घेणे हे कितपत योग्य आहे? अभिव्यक्ती स्वतंत्र्याच्या नावाखाली गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणे देशाला घातक आहे. अशी आमची भूमिका आहे.
इनामदार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, 2006/2007/2008 या दरम्यान देशात मालेगाव, समझोता एक्सप्रेस, दर्गा अजमेर शरीफ, मक्का मस्जिद हैदराबाद या ठिकाणी आरडीएक्सचा वापर करून मोठे बॉम्बस्फोट घडविण्यात आले.
2008 साली मालेगाव या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास करीत असताना तत्कालीन एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांनी सर्वात प्रथम साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना अटक केली. त्यानंतर अटकेचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले. कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय स्वामी दयानंद पांडे, जतीन चटर्जी उर्फ स्वामी असिमानंद, रामचंद्र कालसंग्रा यासारखे अशा अनेक गुन्हेगारांना अटक करण्याचा धाडस हेमंत करकरे यांनी केले. विशेषतः या अटके दरम्यान देशातील अनेक हिंदुत्ववादी संघटना त्यावेळी असलेल्या राज्य सरकारच्या विरोधात मोठे गरळ ओकत होत्या विविध ठिकाणी राज्य सरकार व एटीएस अधिकाऱ्यांविरोधात धरणे आंदोलन केले तर काही संघटनांनी चक्क शहीद हेमंत करकरे यांची प्रतिकात्मक धिंड काढली अशा रितीने प्रचंड दबाव सुरू असताना होता.
न्यायालयामध्ये या गुन्हेगारांविरोधात खटला सुरू आहे. कर्नल पुरोहित यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत व त्याचे पुरावे एटीएस चीफ हेमंत करकरे यांनी मिळवले आहेत. त्यांच्यात झालेला संवाद असेल बाॅंबस्फोटाचा कट असेल वेगवेगळ्या राज्यात झालेल्या मीटिंग, व्हिडिओ कॉल, ऑडिओ रेकॉर्डिंग, व त्याचे शब्दांकन हे सर्व कोर्टामध्ये सादर केलेले आहे. कोणत्याही दृष्टिकोनातून पुरोहित निर्दोष नाही , असे न्यायालय व चार्जशीटच्या माध्यमातून दिसून येत आहे. पूर्वी एटीएसने केलेल्या तपासानंतर हा तपास नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी मार्फत सुद्धा करण्यात आला त्यांनी केलेल्या तपासामध्ये पण बरेच काय तथ्य आढळून आले आहे. त्यांनीही ते सर्व पुरावे न्यायालय पुढे सादर केले आहेत. मुख्य तपास चालू असतानाच 26/ 11 चा हल्ला घडला. यामध्ये हेमंत करकरे शहीद झाले.
या खटल्यातून आज पर्यंत यापैकी कोणीही निर्दोष मुक्त झालेले नाही. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर सुद्धा मेडिकल कारण दाखवून बाहेर आहे तर कर्नल पुरोहितही जामीनावर बाहेर आहे. ते निर्दोष मुक्त झालेले नाहीत. न्यायालयात यांचा खटला सुरू आहे.
दरम्यान, आंदोलन प्रसंगी मोठ्या पोलीस बंदोबस्त होता. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुस्तक प्रकाशन आयोजकांचा, लेखकाचा व कार्यक्रमाला येणाऱ्या निवृत्त आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी भीमआर्मी बहुजन एकदा मिशनचे अध्यक्ष दत्ता पोळ, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार,जीसार फाउंडेशनचे अध्यक्ष नीताताई अडसुळे, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गणेश बावणे, संध्याताई वाघमारे, मंदा गायकवाड, सतीश पवार, समाजवादी पक्षाचे नेते अनिस अहमद, इनक्रेडिबल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अस्लम बागवान, अहमद सय्यद, आरिफ काच वाला, बाबा सय्यद, राष्ट्रप्रेमी कृती समितीचे अध्यक्ष अहमद मणियार, सुजाताताई नाईकवडी, लता शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मामा घुमरे, रमेश सूर्यवंशी, अन्सार पिंजारी, रियाज शेख, रमेश सूर्यवंशी, विवेक सावंत, शहानवाज शेख, इत्यादी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.