प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील केवळ 51 टक्के रिक्षाचालकांनी मीटर पुन:प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) केले असून, अजूनही 49 टक्के रिक्षाचालकांनी ते केले नाही. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने पुन्हा मुदतवाढ न दिल्याने रिक्षाचालकांना आता दंड भरून मीटर कॅलिब्रेशन करावे लागणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण एक लाख नऊ हजार 775 रिक्षा आहेत. पुणे शहरातील 82 हजार 523 रिक्षापैकी 49 हजार 313 रिक्षा चालकांनी तर पिंपरी-चिंचवड शहरातील 27 हजार 252 रिक्षांपैकी केवळ सात हजार 642 रिक्षाचालकांनी 31 नोव्हेंबरपर्यंत मीटर कॅलिब्रेशन केले आहे. सीएनजी दरवाढीमुळे रिक्षाचालकांकडून रिक्षाभाडे वाढीची मागणी केली जात होती. आरटीओने खटुआ समितीच्या शिफारशीनुसार एक सप्टेंबरपासून पहिल्या दीड किलोमीटरसाठी 25 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये भाडेवाढीला मंजुरी दिली होती.