पुणे : मावळते पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला.

 



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला.राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार यांची गृहविभागाने पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

अमिताभ गुप्ता यांची गृहविभागाने राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली. रितेश कुमार भारतीय पोलिस सेवेच्या १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याचे आव्हान पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्यासमोर आहे. नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच गंभीर गुन्ह्यांचा तपासाबाबतची माहिती ते घेणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post