पुणे , पिंपरी चिंचवड मधील 16 रिक्षा संघटना “बेमुदत बंद’



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे – रिक्षा संघटनांनी बाइक टॅक्‍सी विरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही बाइक-टॅक्‍सी सेवा पूर्णपणे बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात आली आहे. याविरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील 16 रिक्षा संघटनानी आज पासून “बेमुदत बंद’ राहणार आहेत.

बाइक टॅक्‍सीविरोधात रिक्षा संघटनांनी 28 नोव्हेंबर रोजी आरटीओसमोर आंदोलन केले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांतील बहुतांश रिक्षा चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समिती स्थापन करून कारवाई करण्याच्या आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पण, जर 12 डिसेंबरपर्यंत बेकायदा बाईक टॅक्‍सी बंद केली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला होता. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पण, त्यात रिक्षा संघटनेचा प्रतिनिधी नाही. तसेच समिती कागदावरच असून प्रत्यक्षात बाइक टॅक्‍सीविरोधात कारवाई केली गेली नाही. रिक्षा टॅक्‍सी बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा निर्धार रिक्षा संघटनांनी व्यक्त केला आहे.

रिक्षा बंद आंदोलनावर 16 संघटना ठाम आहेत. बाइक टॅक्‍सी बंद करेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. समिती स्थापन केली असली तरी यात एकही रिक्षा संघटनेचा प्रतिनिधी नाही. या समितीवर आमचा विश्‍वास नाही.
– केशव क्षीरसागर, प्रतिनिधी, रिक्षा संघटना

Post a Comment

Previous Post Next Post