महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बाबर याचे आवाहन..
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे शहरातील नागरिकासाठी व महिला भगिनीसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलामुळे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.याचा लाभ सर्वसामान्य रुग्णांनापर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे, पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक जीवन उपयोगी शिबीर आयोजित करण्यात आले होते, याचं पार्शवभूमीवर पुणे शहर मनसेच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे, तरी शहरातील सर्व भागांतील नागरिकांनी आवश्य फायदा घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केले आहे.
यावेळी बाबर म्हणाले की, सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून आपले कर्तव्य बजावत आहे.रूग्णांनी डोळ्याच्या आजारपणाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावेत नागरिकांनी आरोग्य संदर्भात मनाने कुठलीही औषधे घेऊ नयेत.