भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी,' या प्रमुख मागण्यांसाठी शहर-उपनगरांत बंद पाळण्यात आला

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहरात मंगळवारी सर्वपक्षीय व संघटनांनी मूक मोर्चा काढला. यावेळी 'राज्यपाल कोश्‍यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्‍ते सुधांशु त्रिवेदी यांची हकालपट्टी करण्यात यावी. याबद्दल भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी,' या प्रमुख मागण्यांसाठी शहर-उपनगरांत बंद पाळण्यात आला.तसेच छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते लाल महाल मार्गावर मूक मोर्चा काढण्यात आला. यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

मंगळवारी सकाळी डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राजकीय पक्षांबरोबर 22 पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था आणि संघटना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार सुनील टिंगरे, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर, गजानन थरकुडे, संजय मोरे, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे पाटील, राजेंद्र कुंजीर, विकास पासलकर आदी उपस्थित होते.

या मोर्चामध्ये तरुणांबरोबरच महिलांचे लक्षणीय सहभाग होता. हातावर आणि डोक्‍यावर काळ्या पट्ट्या, प्रत्येक धर्माचे झेंडे आणि मोर्चाच्या पुढील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा अशा शिस्तीमध्ये निघालेल्या मोर्चा लालमहालापर्यंत आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांसाठी पाणी आणि चहाची व्यवस्था काही व्यापारी संस्थांच्या वतीने करण्यात आली होती. मुस्लीम, ख्रिश्‍चन, शीख यांच्यासह सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.

पुणे शहर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), आम आदमी, पुणे शहर व्यापारी संघटना, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन, मुलनिवासी मुस्लीम मंच, राष्ट्रसेवा समूह महाराष्ट्र, अखिल भारतीय बहुजन सेना, स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती, पदवीधर विद्यार्थी संघ, श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान, स्वराज्य भूमी प्रतिष्ठान, शिवनेरी रिक्षा संघटना, रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र, युवक क्रांतिदल, शिवसंकल्प संस्था, जातीय लोकाधिकार संघटना महाराष्ट्र, पुणे शहर जिल्हा मातंग समाज, लहुजी समता परिषद, अद्वैत क्रीडा संघ, रिजनल ख्रिश्‍चन सोसायटी, मराठा टायगर फोर्स, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन, मराठा सेवक समिती.

Post a Comment

Previous Post Next Post