राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहआयुक्त पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदल्या

पुणे, नाशिक, नवी मुंबई सहित अनेक शहरातील पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली .


प्रेस मीडिया लाईव्ह :

राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहआयुक्त पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदल्या झाल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने मंगळवारी काढले आहेत.राज्यातील पुणे, नाशिक, नवी मुंबई सहित अनेक शहरातील पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.सदानंद दाते यांची राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहेत. तर विश्वास नांगरे पाटील व निकेत कौशिक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक मुंबई पदी नियुक्ती झाली आहे. मिलिंद भारंबे यांची नवी मुंबई पोलिस (Police) आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.

अमिताभ गुप्ता यांची अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्यपदी नियुक्ती झाली आहे. नवीनचंद्र रेड्डी यांची अमरावती पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर मुंबई गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.रितेश कुमार पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त असणार आहे. तर मधुकर पांडे यांच्याकडे मीराभाईंदर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी असणार आहे. सत्यनारायण चौधरी याच्यावर मुंबई सह पोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्थेची जबादारी राहणार आहे. निशित मिश्रा यांची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवीण कुमार पडवळ यांची मुंबईच्या वाहतूक विभागाचे नवे सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . लखमी गौतम यांची मुंबई पोलिस सहआयुक्त गुन्हे पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अंकुश शिंदे हे नवे नाशिकचे पोलिस आयुक्त असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post