प्रेस मीडिया लाईव्ह :
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालक, मालकांच्या विविध मागण्यांसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र सह देशभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर देशव्यापी रिक्षा टॅक्सी व टुरिस्ट परवाना असलेल्या बस संघटनांनी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात केली आहे. पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर रिक्षा चालक मालकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी बाबा कांबळे रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो रिक्षा संयुक्त कृती समिती, रिक्षा टॅक्सी फेडरेशनचा आंदोलनात सहभाग आहे. यावेळी पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष अनंद तांबे, जय महाराष्ट्र रिक्षा संघटनेचे गुलाब सय्यद, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे विलास खेमसे, मोहम्मद शेख, बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, सोमनाथ कलाटे हे उपस्थित होते.
रॅपिड मोबाईल आपलिकेशन मधून टू व्हीलर ची सुविधा हटवा, रॅपिडो ओला उबेर कंपनीवर जनतेचे फसवणूक केली म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, मान्यता नसताना टू व्हीलर टॅक्सी व्यवसाय करत असेल तर ही सेवा बेकायदेशीर म्हणून घोषित करा. रिक्षा चालक मालकांसाठी प्रलंबित असलेले कल्याणकारी महामंडळ तातडीने घोषित करा. मुक्त रिक्षा परवाना बंद करा ई रिक्षाला परवाना सक्तीचा करा. पिंपरी चिंचवड पुणे येथे मीटर कॅरीबॅशनची मुदत 30 जानेवारीपर्यंत वाढवा. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
विरोधकांना चालक-मालकच धडा शिकवतील महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या माध्यमातून रिक्षा चालक मालकांच्या व कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. देश पातळीवर रिक्षा चालक-मालकांची एकी करून मोठं संघटन उभे करण्यात यशस्वी पुढाकार घेतला आहे. त्याला यश देखील प्राप्त झाले. माझे नेतृत्व मोठे होत असल्याचे पाहून अनेकांना पोटशुळ निर्माण होत आहे. त्यामुळे रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करत आहेत. वास्तविक रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडवून न्याय देणे गरजेचे असताना देखील त्यांना संकटात टाकण्याची कामे बोगस संघटनांचे प्रतिनिधी करत आहेत. त्यांना रिक्षा चालक-मालक धडा शिकवतील, असे बाबा कांबळे यांनी म्हटले आहे