पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पठाण एम एस :

पिंपरी : भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहाबे आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आज राज्यभर त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे.ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी शहरातही निषेध आंदोलन करण्यात आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात एका व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. त्यानंतर एकच गोधळ उडाला. दरम्यान, शाई फेकणाऱ्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य केले होते. यावरून आता वातावरण चांगलचं तापलं आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आज चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. ते पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post