देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहारचा वर्धापन रविवारी (दि. 25) साजरा करण्यात येणार



प्रेस मीडिया लाईव्ह :

 पिंपरी, दि. 22 – देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहारचा वर्धापन रविवारी (दि. 25) साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी पहाटे चार ते रात्री बारा वाजताच्या कालावधीत निगडी आणि देहूरोड वाहतूक विभागातील वाहतूक वळविण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून येथून गौतम बुद्धांची मूर्ती आणून देहूरोड बुध्दविहार येथे स्थापना केली. त्याचा वर्धापन रविवारी साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य तसेच देशभरातील नागरिक देहूरोड येथील बुद्ध विहाराला भेट देतात. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी याबाबत आदेश दिले. आहेत.
जुना मुंबई -पुणे महामार्ग सोमाटणेकडून निगडी -पुण्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सेंट्रल चौकातून पुढे जाण्यास मनाई आहे. या मार्गावरील वाहने सेंट्रल चौकातून उजवीकडे वळून देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाने इच्छित स्थळी जातील. पिंपरीकडून देहूरोडमार्गे मुंबईकडे जाणारी वाहने भक्तीशक्ती चौकातून पुढे न जाता भक्तीशकक्ती चौकाकडून डावीकडे वळून रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील.

Post a Comment

Previous Post Next Post