अकोला पातुर रोडवर अपघात मळसुर येथील गजानन गवई यांचा मृत्यू

बाळापुर पोलिसांचे दुर्लक्ष..


प्रेस मीडिया लाईव्ह :

(मळसुर) : प्रतिनिधी राहुल सोनोने

मळसुर .पातुर तालुक्यातील मळसुर या गावातील गजानन दौलत गवईवय ३८ वर्षे यांचा अपघात दिनांक १९ / १० २०२२ रोजी अकोला पातुर रोडवर झाला होता. या मध्ये त्यांचा मृत्यू झाला .अपघाताच्या वेळी अपघातात असलेली मॅक्झिमो गाडी ही घटनास्थळावरून फरार झाली होती, त्यानंतर तक्रार करत्या महिलेचे चुलत दिर आनंदा गवई यांनी तक्रार दिली होती त्यामुळे त्यांनी मॅक्झिमो गाडीचा उल्लेख केला आहे मात्र दीड महिना होत असताना अद्याप याबाळापुर अपघातामध्ये चौकशी करण्यात आली नाही आणि मळसुर तालुका पातुर जिल्हा वाहनधारकाविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. तसेच याअपघातामध्ये मोटरसायकल चालकाचा (गजानन गवई) मृत्यू झाला आहे तर मोटरसायकल वर बसलेला दुसरा अपघात ग्रस्त देवानंद दौलत गवई वय ४५ वर्षे राहणार मळसूर याला सुद्धा गंभीर मार लागलेला आहे सदर अपघातग्रस्ताला मुकामार मोठ्या प्रमाणात लागला असून एका पायाचे चार वेळा ऑपरेशन झाले आहेत त्यामुळे त्यांना उठता बसता येत नाही अशा अवस्थेमध्ये त्यांनी खाजगी दवाखान्यां मध्ये लाखो रुपये खर्च करून उपचार घेतला आहे मात्र आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना आता उपचार कठीण झाला आहे. अशा अवस्थेत काय करावे असा प्रश्न त्या कुटुंबाला पडला आहे. असा आरोप करणारी तक्रार श्रीमती दिपाली गजानन गवई राहणार मळसुर यांनी ठाणेदार बाळापुर आणि पोलीस अधीक्षक यांना७ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

प्रतिक्रिया 

सदर अपघातामध्ये यापूर्वी दिलेल्या तक्रारीमध्ये अपघात करणाऱ्या गाडी बाबत तक्रारीमध्ये त्रुटी होत्या. त्यामुळे गाडीची माहिती घेण्याकरता अडचणी आल्या मळसुर येथील जखमीचे बयान घेतल्यानंतर यामध्ये चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

जितेंद्र आवळे ठाणेदार पोलीस स्टेश

प्रतिक्रिया

माझ्या पतीचा अपघात करणाऱ्या चार चाकी वाहनाविरुद्ध अद्याप कारवाई नाही | माझे दोन्ही  मुले आणि मी वारंवार पोलीस स्टेशनला जात असतानाही सुद्धा पोलीस तपास करत नाहीत

दिपाली गजानन गवई मुर्तकाची पत्नी

Post a Comment

Previous Post Next Post