प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
पनवेल कर्जत रेल्वेच्या दुसऱ्या मार्गाचे काम करताना ठेकेदारांनी निष्काळजीपणे त्या ठिकाणी ब्लास्टिंग केले या ब्लास्टिंग मध्ये चौक कर्जत रस्त्यावरून प्रवास करणारे माय लेक यांना आपला जीव गमवावा लागला,तर एका कामगाराचे हात पाय निकामी झाले,असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
हे काम रेल्वेचा बोगदाचा जे व्ही मध्ये काम चाललेला असून ब्लास्टिंग कशा पद्धतीने करायची ओवर ब्लास्ट केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याला रेल्वेचे इंजिनियर जबाबदार असून ठेकेदारावरती मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी येथील परिसरातील नागरिकांनी केले आहे
पनवेल ते कर्जत रेल्वेच्या बोगद्याचे काम चालू असून रायगड जिल्ह्यातील बड्या ठेकेदारांना हे काम मिळाले असून त्यामुळे यांचे बड्या अधिकाऱ्यांशी संबंधित असल्यामुळे आमचं कोणी काही करू शकत नाही ब्लास्टिंग चे काही नियम आहेत किती प्रमाणात होल खोलवर पाडायचे त्यामध्ये सुद्धा अटी दिलेल्या असतात कलेक्टर तहसीलदार यांचे परमिशन असतात तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा परमिशन घ्यायला लागते हे काम पाहत असताना सरकारी अधिकारी यांचा दुर्लक्ष असल्यामुळे कॉन्टॅक्टर नी कुठली जबाबदारी घ्यावी व आपल्याला मिळालेले काम एक योग्य रीतीने झाले पाहिजे ब्लास्टिंग करत असताना सतर्कचा इशारा देण्यात यायला यावा ब्लास्ट करण्यापूर्वी आजूबाजूच्या परिसर पाहून शिट्टी वाजवणे सायरन वाजवणे त्या परिसरातील येणाऱ्या गाड्या यांना थांबवणे त्या गोष्टी विचार करूनच पुढील ब्लास्टिंग करावी अशी शासनाची तंतोतंत परवानगी असते या परवानगीचा कुठलाही पालन न केल्यामुळे आज ही घटना येथे घडली आहे
पनवेल_कर्जत रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या ट्रॅक चे काम सुरु आहे.हा रेल्वे मार्ग कर्जत चौक मार्गाला अनेक ठिकाणी समांतर असा आहे. ब्लास्टिंग कर्जत चौक रस्त्यापासून साधारण वीस मीटर अंतरावर करण्यात आले असून हे ब्लास्टिंग करताना या परिसराची कोणतीच काळजी न घेता व या मार्गावरील वाहतूक विशिष्ट अंतरावर न थांबवता, परिसरातील लोक वस्तीत कुठलीच पूर्व सूचना देण्यात आली नाही. ब्लास्टिंग केल्याने उंच उडालेल्या दगडात कर्जत येथील मायलेक यांना जीव गमवावा लागला. त्याच वेळेला याच मार्गावरून जाणारे सात बाईक बाईक स्वार यांच्यावर उंच उडालेले दगड पडल्याने तेही जखमी झाले आहेत. उंच उडालेले दगड उडालेले दगड रस्त्याच्या कडेला असलेल्या लोक वस्तीत,भाजीची दुकान चिकनची दुकान फुलांची दुकान यावर दगड पडल्याने नुकसानी बरोबर तेही जखमी झाले आहेत त्यांच्या दुकानांचे नुकसान झाले आहे. ट्रॅक च्या वरच्या बाजूला असलेला डंपर यानेही पेट घेतल्याने तो जळत असून त्याच्या डिझेल टाकीचा व टायरचा देखील स्पोर्ट झालेला आहे.येथे जमलेल्या स्थानीक जनतेने रास्ता रोको केला. जवळपास एक तास झाला तरीही या परिसरातील कोंडी तशीच आहे. पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, मंडळ अधिकारी किरण पाटील, अपघातग्रस्त टीमची रुग्णवाहिका, समाजसेवक श्याम साळवी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी आंदोलन करनारे यांना विनंती केली असून आंदोलन करते रस्त्यावरून उठण्यास तयार नाहीत त्यामुळे संध्याकाळी घरी जाणाऱ्या कामगार, विद्यार्थी यांची मोठी तारांबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवस या परिसरातील जनता हे ब्लास्टिंग बंद करण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी विनंती करीत आहे, तरीही रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने हा आजचा प्रकार घडला आहे,असे माजी सरपंच प्रफुल विचारे यांनी सांगितले. येथील ठेकेदार हा अतिशय मगरमस्त असून वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या बैठकीत बसणार असल्याने येथील प्रशासन देखील त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे असे सध्या तरी येथील आक्रोश करणाऱ्या जनतेकडून व स्थानिक नेत्यांकडून ऐकण्यास मिळत आहे, जखमी ना जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत असून पोलीस या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहेत.