१५ दिवसात होणार प्रक्रिया; गावोगावी पदासाठी लागली फिल्डिंग
सरपंच पद नाही निदान उपसरपंच पद आपल्याकडे राहावे सुरु रस्सीखेच
प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रतिनिधी : राहुल सोनोने (मळसुर)
पातूर :- तालुक्यातील २८ गावामध्ये निवडणूक पार पडली. यावेळी सरपंचपदाची निवड थेट मतदार संघातून करण्यात आली. अनेक गावांमध्ये सरपंच एका पॅनल चा झाला तर सदस्य दुसऱ्या पॅनलचे विजयी झाले. त्यामुळे आता सरपंचपदासाठी चढाओढ निर्माण होणार आहे. २० डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीचे कारभारी निवडल्या गेले. कुठे पॅनलला बहुमताचा कौल तर कुठे सरपंच आले आणि सदस्य पराभुत झाले. कुठे बहुमताच्या आकड्यापासून पॅनल दूर अशी स्थिती आहे. आता पातुर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीत उपसरपंच निवडीच्या हालचालींना वेग आला आहे.किमान उपसरपंच पद आपल्याकडे राहावे यासाठी रस्सीखेच सुरू झाली गटागटातील हालचाली वाढल्या असून उपसरपंच निवड प्रक्रियेची आता प्रतीक्षा सुरू झाली आहे.
महिन्याभरापासून सुरू असलेली ग्रामपंचायत निवडणुकीने तापलेले वातावरण थंड होऊ लागले आहे. प्रत्येक पॅनल मध्ये निवडून आलेल्या सदस्यांचे संख्याबळी सर्वात ठाऊक झाले परंतु उपसरपंच कोण हे अद्यापही ठरलेले नाही. उपसरपंच कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यासाठी लाॅर्बिंग सुरू झाली आहे. पूर्वी निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचांची निवड व्हायची त्यामुळे निवडणूक आटोपताच सदस्य वारीवर निघायचे मात्र थेट सरपंच निवडले गेले त्यामुळे त्याला पायबंद बसला आहे. उपसरपंचाची निवड मात्र सदस्यांमधून होणार असल्याने गाव पुढार्यांची पुन्हा डोकेदुखी वाढणार आहे.यापूर्वी गावप्रमुख्यांनी ठरवलेल्या उपसरपंचास काहींनी विरोध दर्शविण्यास प्रारंभ केला आहे. उपसरपंच पद आपल्याला मिळावे यासाठी अनेकांनी लाॅर्बिंग वाढविली आहे.
उपसरपंच निवडीच्या तारखेकडे लक्ष
उपसरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यां मधून संस्थानिक पातळीवर होणार आहे.यासाठी जिल्हा अधिकारी तारीख ठरवून देतात व त्यानुसार तहसीलदार त्यांच्या तालुक्यात उपसरपंचाची निवडणूक घेतील अशी माहीती आहे.त्यामुळे आता गावागावांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. सरपंच पदासाठी विजयी झालेल्या सदस्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. लवकरच तारीख जाहीर होणार असून त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.