प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
दुखःद शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटना जिल्हा अध्यक्ष देवा पाटील यांचे वडील अनंता नारायण पाटील (पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष ) यांना आज पहाटे ३.०० वाजता देवाज्ञा झाली. पाटील कुटुंबाच्या दु:खात संपुर्ण शेतकरी कामगार पक्ष सहभागी आहे त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना त्यांचा अंत्यविधी आज रविवार दुपारी १.०० वाजता त्यांच्या राहत्या गावी देवळोली येथे होणार आहे .
शोकाकुल समस्त शेतकरी कामगार पक्ष ...
अनंतराव पाटील हे पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. पनवेल-उरण तालुक्यात विशेषतः रसायनी परिसरात ते शेतकरी आणि समाजासाठी लढ्यांमध्ये कायम सहभागी होते. त्यांच्या जाण्याने त्या परिसरामध्ये कधीही न भरणारी पोकळी निर्माण झालेली आहे. आपला समाज आणि त्याविषयी कायम बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व आज हरपले. याचं मनापासून दुःख होत आहे. प्रत्येक भेटीत काहीतरी तळमळीने लोकउपयोगी सांगणारे आणि खरं पाहता बऱ्याच वेळा सल्ला देणारे सर्वांचे मार्गदर्शक. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला...गेली 5-6 दिवस ते अपोलो हॉस्पिटल येथे उपचार घेत होते.
ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांस या सर्व दुःखातून सावरण्याची ताकद देवो