भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मविआ आक्रमक,'

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

नागपूर - घेतले खोके भूखंड ओके. भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो. खोके सरकार हाय हाय. खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो. भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. 'मित्रा' चे लाड करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा.या सरकारचं करायच काय, खाली डोकं वर पाय. मुख्यमंत्र्यांची खोलली पोल हल्लाबोल हल्लाबोल.छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍या राज्यपालाला हटवा.. ईडी सरकार हाय हाय.स्थगिती सरकार हाय हाय. अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत तिसऱ्या दिवशीही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सलग तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, कालच्या दुसऱ्या दिवसाच्या घोषणाबाजी नंतर आज देखील विरोधक आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले.तर दुसरीकडे सभागृहात टीईटी परीक्षेत गैरप्रकार करुन प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या शिक्षकांच्या मान्यता आणि शालार्थ आयडी रद्द करण्याच्या कारवाईसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नातील काही भाग विधानमंडळ सचिवालयाने परस्पर गाळल्याबद्दल अजित पवार यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासाला आक्षेप नोंदवला. आणि या गंभीर परिस्थितीतीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. विधानसभा अध्यक्षांनी हा प्रश्न राखून ठेवून या संपूर्ण गैरव्यवहाराची चौकशी करुन सभागृहात निवेदन करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post