विधान भवन परिसरात शाईपेनावर बंदी
प्रेस मीडिया लाईव्ह :
नागपूर - उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातील कार्यक्रमात शाईफेक झाल्याचे पडसाद आता विधान भवनातही उमटताना दिसत आहेत. असे संभाव्य प्रकार टाळण्यासाठी विधान भवन परिसरात शाईपेनावर बंदी घालण्यात आली आहे.विधिमंडळात येणाऱ्या सर्व व्यक्तींचे पेन तपासण्यात येत आहेत .
या वेळी शाई पेन विधान भवन परिसरात आणणाऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे.महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पएका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध करण्याकरता पुण्यातील समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. याप्रकरणी एका पत्रकारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच, त्यानंतरही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमात पत्रकारांचे पेन तपासण्यात आले होते. आता विधिमंडळात येणाऱ्यांचेयही पेन तपासण्यात आले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेकीचा धसका सरकारने घेतला असून सुरक्षेची जबाबादारी पोलिसांवर आहे. खबरदारी म्हणून त्यांच्याकडून कार्यवाही होत असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.