महापुरूषांचा अपमानबाबत महाविकास आघाडीकडून हल्लाबोल

राज्यातील जवळपास सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी सहभाग घेतला 





प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : महापुरूषांचा अपमानबाबत महाविकास आघाडीकडून हल्लाबोल मोर्चाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत राज्यभरातून जवळपास एक लाखं कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग घेतला आहे.या मध्ये राज्यातील जवळपास सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी सहभाग घेतला असून आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांनी झेंडे घेऊन मोर्चात सहभाग घेतला आहे.महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. त्याचबरोबर या मोर्चात समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते, मॉर्क्सवादी पक्षाचे झेंडे, शेतकरी कामगार पक्ष तसेच राज्यातील राजकीय तसेच वेगवेगळ्या संघटनांनी सहभाग घेऊन आपापले झेंडे घेत हल्लाबोल करत जोरदार घोषणाबाजी देत आहेत.

त्याआधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैन्यात करण्यात आला आहे. तसेच भाजप आमदारांच्या तसेच शिंदे गटातील आमदारांच्या घराच्या बाहेर देखील पोलीस कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईच्या पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहेतत्याआधी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महामोर्चासाठी लोकलने प्रवास करून सहभागी झाले आहेत. ठाणे, नवी मुंबई, कर्जत, कसाऱ्याहून कार्यकर्त्यांनी मुंबईकडे कुच केली आहे. या महामोर्चासाठी अनेक बस देखील मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post