प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : सलग चार वेळा नगरसेवक राहिलेल्या, महापालिकेतील विविध समित्यांसह महापौर पदही भूषवलेल्या आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार 'मुक्ता टिळक' यांचे नुकतंच (गुरूवारी) निधन झाले आहे.त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश, मुलगी चैत्राली, मुलगा कुणाल, जावई, सून असा परिवार आहे. भाजपच्या अत्यंत धडाडीच्या, तळागाळासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ख्याती होती.
दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर अवघ्या पाचच दिवसात राष्ट्रवादीच्या नेत्या ‘रूपाली ठोंबरे पाटील’ यांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे’. असं त्या म्हणाल्या आहेत. यावेळी रूपाली ठोंबरे पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेसने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे. मुक्ताताईंच्या नंतर त्यांच्या घरात राजकारणात येण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी कोणीही नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रिय नाहीत, मुलगा सुद्धा लहान असून त्याचं नुकतंच लग्न झालं आहे” असं वक्त्यव्य त्यांनी केलं आहे.
दरम्यान, त्यांच्या या विधानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून वरिष्ठांना न विचारताच आपली भूमिका मांडल्यामुळे शहरातील पदाधिकारी देखील आता त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षांतर्गत नाराजीचे सुर दिसून येत आहेत.