प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रतिनिधी राहुल सोनोने ( मळसुर)
मळसूर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पांगरा चान्नी मार्गावरील पांगरा जवळ शेतकरी पती-पत्नीला मारहाण करून चाकूने जखमी करून लूटमार केल्याची घटना मंगळवार दि.२७ डिसेंबर रोजीच्या रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली,
पांगरा येथील शेतकरी पती भास्कर श्रीराम इनस्कार,पत्नी गोदावरी बाई भास्कर इनस्कार २७ डिसेंबर रोजीच्या रात्री ९:३० वाज्याच्या सुमारास शेतात पिकावर राखण करण्यासाठी जात असताना, पांगरा जवळ अनोळखी चारजण मोटरसायकलवर आले आणि पती-पत्नीला चान्नी रस्ता विचारल्याचे सांगून मारहाण व चाकुने जखमी करून खिशातील ७०० रुपये,मोबाईल किंमत हजार रुपये व गळ्यातील नकली सोन्याची पोत लुटून दुचाकीवर चौघेजण पसार झाले, सदर घटने दरम्यान सावरगाव येथून चारचाकी दोन पत्रकार चान्नीकडे येत असताना चारचाकी पाहून भीतीपोटी अनोळखी चौघेजण दूचाकीवर बसून पळ काढला, पती-पत्नीने थेट चान्नी पोलीस स्टेशन गाठले भास्कर श्रीराम इनस्कार ५५ यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी अनोळखी चौघेविरुद्ध भादविच्या ३९४,३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार योगेश वाघमारे करीत आहे.