राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष : अनेकांचे संसार.. उध्वस्त
राहुल सोनोने (मळसुर) : प्रतिनिधी :
मळसूर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत मळसुर येथील अधिकृत देशी दुकानातून परिसरातील ३७ गावात देशी दारूची घरपोच सेवा सुरू आहे . त्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हेतूप्रस्पर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
मळसूर येथे अधिकृत देशी दारूचे दुकान आहे. शासनाच्या नियमनुसार देशी दारूच्या दुकानातून विक्री करण्यासाठी देशी दारूच्या पेट्याची अवैध वाहतूक करता येत नाही. परंतु देशी दुकानदार व संबंधितांच्या मिलीभगत मुळे गेल्या काही महिन्यापासून दूचाकीवर सर्रास देशी दारूच्या पेट्याची परिसरात ३७ गावात घरपोच सेवा सुरू आहे. त्यामुळे परिसरात देशी दारूचा महापूर आल्याचे चित्र आहे. चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत ३७ गावात देशी दारूची सर्रास विक्री होत असल्याने तरुण मंडळी दारूच्या आहारी गेली आहे . तसेच मद्यप्राशन करून पतीकडून पत्नीला मारहाण करून मानसिक त्रास दिल्याचे अनेक प्रकार सुद्धा उघडकीस आले आहे. याबाबत परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधिताकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु संबंधितांकडून फर्स्ट कारवाई करण्याऐवजी थातूरमातूर थातूरमातूर कारवाई केली जाते ,याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्यांशी संपर्क करून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही
बॉक्स
मालकाऐवजी दुचाकी चालकावर कारवाई
अधिकृत देशी दुकानातून परिसरात ३७ गावात देशी दारूची अवैध वाहतूक सुरू असते, परंतु मालकाऐवजी दुचाकी चालकवरच कारवाई केली जाते,
प्रतिक्रिया
मळसूरच्या देशी दुकानातून चतारीसह परिसरात अनेक गावात देशी दारूची पार्सल सेवा सुरू आहे. त्यामुळे तरुण मंडळी दारूच्या आहारी गेले आहे. याबाबत वारंवार संबंधिताकडे तक्रारी करण्यात आल्या परंतु ठोस कारवाई करण्यात ऐवजी थातुरमातुर कारवाई केली जाते,
पवन रवींद्र सरदार सामाजिक कार्यकर्ता चतारी
प्रतिक्रिया-----------
मळसूरच्या देशी दुकानातून परिसरात ३० ते ३५ गावात देशी दारूची दूचाकीवर सर्रास अवैध वाहतूक करून घरपोच सेवा दिली जाते, त्यामुळे परिसरात देशी दारूचा महापूर आला आहे.
संदीप सोनोने सामाजिक कार्यकर्ता मळसुर
बॉक्स ----------------_-------------------
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावात ग्रामपंचायतच्या निवडणुका तोंडावर असून, देशी दारूच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाद-विवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत दारूबंदी करणे आवश्यक आहे.