आज रात्री शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळणार
प्रेस मीडिया लाईव्ह :
सुनील पाटील :
सरत्या वर्षाला निरोप देताना 'थर्टी फर्स्ट' सेलिब्रेशन करण्याकडे सर्वांचाच कल वाढला आहे. त्यामुळे थर्टी फर्स्ट कशा पद्धतीने सेलिब्रेट करायचे, याचे बेत आत्तापासूनच ठरू लागले आहेत.शहरातील प्रमुख हॉटेल्सकडून आकर्षक सजावटीवर भर देण्यात आला आहे. तसेच, खास मेनू आणि पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत.
दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून, सगळी कडे जोरदार तयारी सुरु झाली आहे. हॉटेल्सला आकर्षक अंतर्गत आणि बाह्य सजावट केली जात आहे. तर दुसरीकडे, पर्यटन ठिकाणी देखील नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहेतसेच नव वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांवरही पोलीस नजर ठेवून आहेत. खासकरून तळीरामांवर पोलिसांची करडी नजर असणार असून दारू पिऊन ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार आहेत. आज रात्री शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळणार आहे..