२६ डिसेंबर कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलानात 'बाळासाहेबांची शिवसेना'चे हजारो कार्यकर्ते सामील होण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी (२६ डिसेंबर) कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलानात 'बाळासाहेबांची शिवसेना'चे हजारो कार्यकर्ते सामील होण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे कार्यकर्त्यांची बैठक झाली.  

 सीमावासियांवर होणाऱ्या अन्याया विरोधात शिवसेनाप्रमुख  बाळसाहेब ठाकरे यांनी नेहमीच आवाज उठविला आहे. सीमा लढ्यात शिवसेनेने ६९ हुतात्म्ये दिले तर स्वत: शिवसेनाप्रमुखांनी कारावास भोगला आहे. सीमावादाची पहिली प्रतिक्रिया नेहमीच कोल्हापुरातून उमटली असून, सीमावासीयांच्या पाठीशी कोल्हापूर नेहमीच उभे राहिले आहेत असे क्षीरसागर यांनी सांगितले. 
  शहरासह जिल्ह्यातून मोटरसायकल रॅलीद्वारे शिवसैनिक सकाळी १० वाजता शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ येथे दाखल होतील. याठिकाणाहून एकत्रितपणे सीमा बांधवांना पाठींबा देण्याकरिता हजारोंच्या संख्येने शिवसैनिक दसरा चौक येथे जाणार आहेत. सीमाबांधवांना पाठींबा देण्याकरिता कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकतीने उपस्थित रहावे असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.
 बैठकीस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवानेते ऋतुराज क्षीरसागर, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, उप-जिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, प्रा.शिवाजी जाधव, शहर समन्वयक सुनील जाधव, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पियुष चव्हाण उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post