अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आलीय.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – रंकाळा टॉवर इथं जेसीबीचा धक्का लागून रस्त्यावर पडल्यानं एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. अनुराधा मिलिंद पोतदार(रा. फुलेवाडी) असे त्या महिलेचं नाव असून, या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आलीय.
फुलेवाडी इथं राहणारे मिलिंद पोतदार हे त्यांची पत्नी अनुराधा सह दुचाकीवरून कोल्हापुरात येत होते. दरम्यान. रंकाळा टॉवर परिसरात आले असताना शेजारून निघालेल्या जेसीबीचा धक्का त्याच्या दुचाकीला लागला आणि अनुराधा या रस्त्यात कोसळल्या. तात्काळ, पती मिलिंद पोतदार यांनी सरकारी रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी सीपीआर इथं आणलं. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आलीय.