तारदाळ ग्रामपंचायतीवर कोण..? सत्ता स्थापन करणार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे :

तारदाळ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक लागली असून यामध्ये प्रभाग एक ते सहा मधून सत्तरा सदस्य पदासाठी व एक लोकनियुक्त सरपंच पदासाठी अतीतटी लढत लागली असून सरपंचपद महिला वर्गासाठी आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत महालक्ष्मी ग्रामविकास आघाडी तारदाळ यांचे तर्फे  सरपंचपदाचे उमेदवार म्हणून सौ.पल्लवी रणजित पोवार तर शिरकाईदेवी ग्रामविकास आघाडी  यांचे तर्फे सरपंचपदाचे उमेदवार म्हणून सौ.वैशाली संजय साळुंखे तर तिसरी आघाडी महालक्ष्मी परिवर्तन पॅनेल यांचे तर्फे सरपंचपदाचे उमेदवार म्हणून  सौ.संपदा विजय जाधव यांचे मध्ये तिरंगी लढत होणार असून 

यामुळे सरपंच पदासाठी जोरदार रंगतदार लढत लागली असून यामध्ये कोण? बाजी मारणार याकडे तारदाळ मधील सर्व नागरिकांना उत्सुकता लागली असून चर्चा रंगली आहे.

      तारदाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार  सुरू असून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत महालक्ष्मी ग्रामविकास आघाडी तारदाळचे तसेच तिसरी आघाडी महालक्ष्मी परिवर्तन पॅनेलचे तर शिरकाईदेवी ग्रामविकास आघाडीचे उमेदवारांनी प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला असून , मतदारांच्या भेटीगाठी  सुरू केल्या आहेत.  त्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला असून, ऐन थंडीत राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापल्याचे दिसत आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या आघाडीच्या. पॅनेलच्या, विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित असल्याचे सांगत आहेत. परंतु तारदाळ ग्रामपंचायतीवर कोण? बाजी मारणार, व  कोण ?.सत्ता स्थापन करणार याची उत्सुकता मात्र नागरिकांत लागून राहिली आहे.आणि यांचे चित्र मात्र निवडणूक निर्णयानंतर स्पष्ट होईल.याबाबत जोरदार चर्चा मात्र नागरिकांतून सुरूआहेत.

Post a Comment

Previous Post Next Post