कोडोली येथील बजाज फायनान्सचे ऑफिस बंद करून निषेध करण्यात आला.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

सौ. प्रमोदिनी माने : 

 आज कोडोली येथील बजाज फायनान्सची दादागिरी  गोरगरीबांना व महीलांना , हप्तासाठी, बोलण्याची भाषा शैली होणारे त्रास या बदल आज आपल्या कृती समिती कडे एक अशीच खुप खंबीर प्रकारची तक्रार आली ,आहे .  ज्या ब्रॅच मॅनेजरने त्या गोरगरिबास त्याच्या मोबाईल चार हफ्ते थकीत  आहे म्हणून मोबाईल काढून घेतला ,  तो ते चार हप्ते भरत असुन  देखील त्याचा मोबाईल विकला गेला, व त्याच्यावर लोन सकट  दाखवण्यात आले. या बद्दल  ब्रॅच मॅनेजरला विचारण्यात आले तर तो मोबाईल विकला गेला आहे, तुला काय करायचं ते करून घे अशी भाषा वापरण्यात आली. 

याबद्दल कोडोली येथील युवा नेते माननीय श्री अमर पाटील (बाबा) यांनी त्याबद्दल विचारले असता, त्यांना सकट उलट सुलट अशी भाषा वापरण्यात आली, व ऑफिस टाइमिंग दहा ते पाच आहे,या वेळेसच विचारा मग तुम्ही त्या गोरगरीब मुलाकडे मोबाईल घेण्यासाठी रात्री दहा वाजता कसा गेला हे विचारण्यासाठी गेले असता ब्रॅच मॅनेजर जागेवर नव्हते, व दोन तास वाट पाहुणे ते आमच्यासमोर येत नव्हते, म्हणून आज त्याच्या निषेध म्हणून बजाज फायनान्स कोडोली येथील आज ऑफिसला बंद करण्यात आलेले आहे,कोडोली कृती समिती मार्फत व कोडोली नागरिक नागरिकांच्या तर्फे जाहीर आज निषेध करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post