राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोडोली यांचा इशारा
प्रेस मीडिया लाईव्ह. :
सौ. प्रमोदिनी माने :
कोडोली : महाराष्ट्र राज्य विद्युत विज वितरण कर्मचारी याचे महाराष्ट्र सरकारने खाजगी करण करण्याचे धोरण अंवलबले आहे. सदरचे खाजगी करण करण्यात येऊ नये यासाठी कोडोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कोडोली एम एस. ई.सी.बी. चे अधीक्षक मा. माने साहेब, व इतर कर्मचारी यांना निवेदन देवुन आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रसरकारने खाजगीकरण केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सरकारचा तीव्र निषेध करत आहे. व सरकारने भविष्यामध्ये खाजगी करण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न जर केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोडोली शहर तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी उपस्थित मा. श्री. आदिक जाधव भाऊ अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोडोली शहर. मा. पुरंदर परीट, मा. शाहरुख जमादार, मा. तैय्यब जमादार. उपस्थित होते.