प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : इचलकरंजी मनपातील आरोग्य अधिकारी डॉ. संगेवार हे गेली १५ वर्षापासून एकाच खात्यावर कार्यरत आहे. यांचे जवाहर नगर येथे स्वत:चे हॉस्पीटल असून ते सांभाळून उरलेल्या वेळेत हे आरोग्य अधिकारी म्हणून काम करीत असतात.पालिकेत कधीही गेले तर ते गैरहजर असतात ते गैर असल्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. त्याचे साक्षीदार ही आरोग्य खात्यामधील आहेत.
कामगार किती आहेत त्याची माहिती मिळत नाही. वॉर्डाबाबत कोणतेही माहिती त्यांचे कडे नाही. सांगली, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्याचे वेळ सकाळी ६ ते दु. २ पर्यंत हजेरी घेतली जाते. तसेच २ मुकादम सांगली कोल्हापूर येथे असतात. त्याप्रमाणे इचलकरंजी येथेही लागू करावे. डॉ. संगेवार यांची लवकरात लवकर बदली करून . त्याच्या जागी चांगला आरोग्य अधिकारी नेमणूक करावी अशी मागणी दत्तात्रय मारुती मांजरे.यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.