प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
दिनांक २१/१२/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा, चे पोलीस हवालदार ३७३१ विकांत महादेव पालांडे यांना मिळालेल्या गोपनिय माहीती नुसार दिनांक २१ / १२ /२०२२ रोजी १७:२० वाजताचे सुमारास विव्हियाना मॉल समोरील पोखरण रोडकडुन कॅडबरी जंक्शनकडे जाणारे सर्व्हिस रोडवर, चिरागनगर वर्तकनगर, ठाणे येथून १) चंद्रकांतकुमार नन्नहक महातो रा. विलेपार्ले पूर्व, मुंबई हा Methaqualone मेथॅक्युलिन हा अंमली पदार्थ करीता आणला असताना त्यास ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन २२ ग्रॅम वजनाचा Methaqualone मेथँक्युलिन हा अंमली पदार्थ व इतर वस्तु असा एकुण १,११,७००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदर बाबत वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे गु. रजि.क. ४५९/२०२२ एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीत यास मा. न्यायालयाने दिनांक २६/१२/२०२२ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोनिरी/गिरीश बने हे करीत आहेत. अटक आरोपीत याचेकडुन जप्त करण्यात आलेला Methaqualone मेथक्युलिन हा अंमली पदार्थ त्याने कोठुन व कोणाकडुन आणला? याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने एका नायजेरीयन इसम नामे संडे रा. नालासोपारा या इसमाकडुन खरेदी केली असल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे भाईंदर येथुन संडे इकेजिडे म्मडु ( Sunday IKEJIDE Mmadu ), वय ३५ रा. मिरा भाईंदर या नायजेरीयन नागरीकास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एकुण १६ ग्रॅम वजनाचा Methaqualone मेथँक्युलिन हा अंमली पदार्थ जप्त करणयत आला आहे. सदर नायजेरीयन इसमास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास करीत आहोत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोनि / गिरीश बने, पोउपनिरी/ दिपेश किणी, पोहवा / ३७३१ पालांडे, पोहवा / ५७२९ तावडे, पोहवा / ६४३६ भांगरे, सपोउपनिरी/ परव, पोहवा / २७८८ साबळे, पोहवा / ६३३१ तडवी, पोहवा / १८५९ महाले, पोहवा / १४९५ वासरवाड, पोहवा / २७३६ तरडे, पोना / ४८४७ अनुप राक्षे मपोशि/ ४४१५ पादीर या पथकाने केलेली आहे.